Sambhaji Nagar : संभाजीनगर झेडपी शिक्षकांना प्रशासनाची तंबी; गुरुजींचे साईड बिझनेस बंद होणार?

संभाजीनगर झेडपी शिक्षकांना प्रशासनाकडून तंबी देण्यात आली आहे.

संभाजीनगर झेडपी शिक्षकांना प्रशासनाकडून तंबी देण्यात आली आहे. जोडधंदा बंद करून शिकवण्यावर लक्ष केंद्रीत करा, असे आदेश देण्यात आले आहेत. गटशिक्षणाधिकाऱ्यांची जोडधंदा शोधण्यासाठी पथके सुद्धा आहेत. यामुळे गुरुजींचे साईड बिझनेस बंद होणार, अशी चर्चा यानिमित्ताने चर्चा सुद्धा होत आहे.

शिक्षकांचे जोडधंदे सुरू असल्याने शाळेच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होत असून ताबडतोब जोडधंदा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जोडधंदा बंद न केल्यास दोषीविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com