Sandeep Deshpande: संदीप देशपांडेंचा जुनी ऑडिओ क्लिप शेअर करत आव्हाडांना सवाल

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. जुनी ऑडिओ क्लिप शेअर करत त्यांनी आव्हाडांना सवाल केला आहे.
Published by :
Team Lokshahi

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे. जुनी ऑडिओ क्लिप शेअर करत त्यांनी आव्हाडांना सवाल केला आहे. राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि आव्हाडांमधील संवादाची क्लिप त्यांनी ट्विट केली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या निषेध मोर्चातील शपथेवरून त्यांनी टोला देखील लगावला आहे.

यापार्श्वभूमीवर संदीप देशपांडे म्हणाले, ही ऑडिओ क्लिप जुनी आहे. पण यातून कोणाची काय मानसिकता आहे ते दिसून येते. एखाद असं प्रकरण झालं असेल तर हा मलिकार्जुन पुजारी कोण आहे, याचं खरंच जितेंद्र आव्हाडांसोबत बोलणं झालेलं आहे का? आणि झालं असेल तर हे नेमकं प्रकरण काय आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले

पुढे ते म्हणाले, आपण पाहिली त्यात जी नाव घेतलेली आहेत ती अतिशय गंभीर नाव आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. तो मलिकार्जुन पुजारी कोण आहे? त्याला शोधून काढलं पाहिजे त्याच्यासोबत बोललं पाहिजे, कोणतं प्रकरण होत त्याविषयी पूर्ण चौकशी केली पाहिजे, असं संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com