Sanjay Raut
Sanjay Raut

Sanjay Raut: तू मोठा की मी मोठा, 3 पक्षांत स्पर्धा सुरू; संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

Maharashtra Politics: संजय राऊत यांनी महायुतीवर मतदारांना १०–१५ हजार रुपये देण्याचा गंभीर आरोप केला आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाल स्क्रोल करा...

महाराष्ट्रातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पूर्वसंध्येवर शिवसेना (उद्धव) नेते संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्या २ डिसेंबरला होणार्‍या निवडणुकीपूर्वी शिंदे गटाच्या गुलाबो गँगने आज १ डिसेंबरला लक्ष्मी दर्शन होणार असल्याचे जाहीर केले होते. राऊत म्हणाले, राज्याच्या मंत्र्यांनी हे घोषित केल्यानंतर सकाळपासून अनेक ठिकाणी मतदारांना १० ते १५ हजार रुपयांचे लक्ष्मी दर्शन दिले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. निवडणूक आयोगाने तात्काळ या सर्व ठिकाणांची माहिती घेऊन कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.​

महाराष्ट्रात आतापर्यंत स्थानिक निवडणुकांमध्ये पैशाचा असा खेळ पहिल्यांदाच पहायला मिळत आहे. पूर्वी या निवडणुका स्थानिक नेते लढत असत, पण आता मुख्यमंत्री आणि सरकार स्तरावरून हस्तक्षेप होत आहे. सत्तेतील तीन पक्षांमध्ये अंतर्गत स्पर्धा तीव्र आहे. नगरपालिकांसाठी ५-६ हेलिकॉप्टर्स आणि खासगी विमाने वापरली जात आहेत, जे आधी कधीच घडले नव्हते. ही निवडणूक आता पैशाची लढत बनली आहे. असेही संजय राऊत म्हणाले.

२४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठी उद्या मतदान होईल, ज्यात १ कोटी ७ लाख मतदार सहभागी होतील. राऊतांच्या आरोपांनी निवडणूक आयोगावर कारवाईची जबाबदारी वाढली आहे. प्रचार रात्री १० वाजता थांबला असून, पोलिस कडक सुरक्षा लावतील.

Summary
  • संजय राऊत यांनी महायुतीवर मतदारांना रोकड वाटल्याचा आरोप केला.

  • १०–१५ हजार रुपयांचे "लक्ष्मी दर्शन" दिल्याच्या तक्रारी आल्याचे राऊतांचे म्हणणे.

  • हेलिकॉप्टर आणि खासगी विमानांचा मोठ्या प्रमाणावर प्रचारासाठी वापर.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com