नितीश कुमारांना राजीनामा द्यायचा छंद; राऊतांचा टोला

बिहारमध्ये राजकीय भूकंप झालेला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रया दिली आहे.

मुंबई : बिहारमध्ये राजकीय भूकंप झालेला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर त्यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. यानंतर आता नितीशकुमार भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. हे इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रया दिली आहे. नितीश कुमारांना राजीनामा देण्याचा छंद असल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com