Sanjay Raut: नाशिक भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांचं मोदी, फडणवीसांना पत्र

नाशिक भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी राऊतांनी मोदी आणि फडणवीसांना पत्र लिहलं आहे.
Published by :
Sakshi Patil

संजय राऊत यांनी थोड्या दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हा नाशिकमध्ये भूसंपादनामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. कोट्यवधी रुपये सरकारकडून बिल्डरांनी घेतले पण ज्यांची जमीन आहे त्या लोकांना ते पैसे दिले नाही, असा आरोप राऊतांनी केला होता. आता याच विषयाचं पत्र त्यांनी मोदी आणि फडणवीसांना लिहलं आहे.

नाशिक भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी राऊतांनी मोदी आणि फडणवीसांना पत्र लिहलं आहे. 'पालिकेत अधिकारी, बिल्डरांकडून 800 कोटींचा घोटाळा' केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. जनतेच्या पैशांची लूट सुरु आहे, असा आरोप राऊतानी केला. 'लुटलेल्या एक एक रुपयांचा हिशोब द्यावाच लागेल' असं ही ते म्हणाले. यावर फडणवीस काय कारवाई करणार? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com