Sanjay Raut : 'नियमाप्रमाणे मोदींनी राजकारणातून निवृत्त व्हावं', राऊतांचा खोचक टोला

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावला आहे. सप्टेंबरमध्ये 75 वर्षांचे होतायेत असं राऊत म्हणाले आणि मोदींनी 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्तीचा नियम केलेला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावला आहे. सप्टेंबरमध्ये 75 वर्षांचे होतायेत असं राऊत म्हणाले आणि मोदींनी 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्तीचा नियम केलेला आहे. त्यामुळे मोदींनी निवृत्त व्हायला हवं असं राऊतांनी म्हटलं आहे. तर त्यांनीच बनवलेल्या नियमाप्रमाणे मोदींनी राजकारणातून निवृत्त व्हावं असं राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी केजरीवाल यांच्या वक्तव्याचं समर्थन केलेलं आहे. मोदींना 4 जूननंतर घरी जावं लागेल, जनता त्यांना रिटायर करेल असंही संजय राऊत म्हणाले आहे.

केजरीवाल यांनी यांच्या सभेमध्ये पंतप्रधान मोदी हे 75 वर्षाचे झाल्यानंतर तर ते पंतप्रधान पदावर बसणार नाहीत तर ते आता मतं मागतायेत अमित शाह यांना पंतप्रधान बनवण्यासाठी असा हल्लाबोल केला होता. या वक्तव्याचं संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com