Sanjay Raut On Khadse : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा फेब्रुवारी महिन्यापासून चालू होती. यावर सर्वप्रथम त्यांचे राजकीय विरोधक तथा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीच विधान केले होते.
Published by :
shweta walge

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले एकनाथ खडसे भाजपत प्रवेश करणार आहेत. खुद्द खडसे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला अशी माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खडसे भाजपत जाणार असे सांगितले जात होते. पडद्यामागे तशा हालचालीदेखील होत होत्या. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यांनी दिल्लीत भेटीगाठी सुरु केल्या होत्या. रक्षा खडसेंना मिळालेली उमेदवारी, भूखंड घोटाळ्यात मिळालेला दिलासा हा घटनाक्रम पाहता ते भाजपात पुन्हा जातील असं सांगण्यात येत होतं. अखेर एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपत जाण्याचा निर्णय घेतलाय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com