Satara ZP Election: 'जिल्हा परिषदेवर भाजपचाचं झेंडा फडकणार' शिवेंद्रराजे भोसलेंची मागणी
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा लागला पाहिजे, ही भूमिका साताऱ्यातील सर्व आमदार आणि मंत्र्यांची ठाम आहे. ज्या पक्षासाठी आम्ही पूर्वी काम केलं, त्या राष्ट्रवादीला या जिल्ह्याने तब्बल आठ आमदार दिले; मात्र तरीही साताऱ्यावर कायम अन्यायच झाला, अशी स्पष्ट टीका सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी केली आहे.
आज सातारा जिल्ह्यात महायुतीचे पाच मंत्री आहेत, त्यापैकी दोन मंत्री भाजपचे आहेत. भाजपला साताऱ्याने भरभरून मतदान दिलं आणि पहिल्याच प्रयत्नात भाजपने पाच मंत्री देत जिल्ह्याला न्याय दिला, असं ते म्हणाले.
दरम्यान, जिल्ह्यातील शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष हे निवडणुकीपुरते ये–जा करतात, अशी खोचक टीका करत, प्रदेशाध्यक्षांच्या गावातला रस्तासुद्धा भाजपनेच दिला आहे, हे विसरून चालणार नाही, असा टोला त्यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता लगावला.
