व्हिडिओ
Satish Bhosle Case : 'सुरेश धस आणि आमचा काही संबंध नाही'; खोक्याच्या पत्नीचा खुलासा
सुरेश धस फसवले जात आहेत: तेजु भोसलेचा खोक्या भोसलेच्या बचावात खुलासा
हरीण आमचा देव आहे. हरणाच्या मांसाचे आरोप खोटे आहेत, असं खोक्या भोसलेची बायको तेजु भोसलेने म्हंटलं आहे. सुरेश धस यांना फसवलं जात आहे, असंही तेजु भोसलेने म्हंटलं आहे. तसंच घरात सापडलेलं मांस रानडुकराचं होतं, हरणाचं नाही असं तेजु भोसले म्हणाली आहे.
आरोपी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर पैसे उधळतो, हरणाची शिकार करतो, सोनं उधळतो असा आरोप झाला होता. त्यावर आज तेजु भोसलेने प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे सगळे खोटे आरोप आहेत. हरीण मारणं वगैरे ते करत नाही. हरणं आम्हाला माहीतचं नाही. आम्ही रानडुक्करची शिकार करतो. घरात संपलेलं मांस हे रानडुक्कर आणि तुळजापूरच्या देवीला नैवेद्य म्हणून बोकड कापला होता त्याचं होतं. सुरेश धस म्हणतात तसं आम्हाला फसवलं जात आहे. हरणाला आम्ही देव मानतो. पण गावातले लोक माझ्या नवऱ्याला फसवत आहेत, असंही यावेळी तेजु भोसलेने म्हंटलं आहे.