Kandivali: मुख्यमंत्री सचिवालयाच्या लिपिकाकडून नागरिकाला धमकी, लिपिक संतोष केरू सोनावणे यांचा प्रताप

मुख्यमंत्री सचिवालयाच्या लिपिकाकडून नागरिकाला धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. या नागरिकाला घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Published by :
Team Lokshahi

मुख्यमंत्री सचिवालयाच्या लिपिकाकडून नागरिकाला धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. या नागरिकाला घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या लिपिकाचं नाव संतोष सोनावणे आहे, ज्याने हा प्रताप केला आहे. आरटीआय अंतर्गत माहिती मागवल्याच्या रागातून संतोष सोनावणे यांनी ही धमकी दिली. याच रागात लिपिक संतोष सोनावणे यांनी नागरिकाचा नंबर आणि पत्ता काढून त्याच्या घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी दिली. आरटीआय अंतर्गत माहिती मागवणं हा नागरिकांचा अधिकार आहे पण जेव्हा ही माहिती मागवली तेव्हा मुख्यमंत्री सचिवालयाच्या लिपिकाकडून नागरिकाला धमकी देण्यात आली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com