Shahu Chhatrapati Maharaj : 'अद्याप ऑफर नाही मात्र येण्याची शक्यता', शाहू छत्रपती महाराजांच वक्तव्य

लोकसभेची उमेदवारी मिळाली तर अनेकांना आनंद होईल. आपल्याला अद्याप ऑफर आलेली नाही मात्र येण्याची शक्यता आहे.
Published by :
Dhanshree Shintre

लोकसभेची उमेदवारी मिळाली तर अनेकांना आनंद होईल. आपल्याला अद्याप ऑफर आलेली नाही मात्र येण्याची शक्यता आहे. छत्रपती शाहू महाराजांचं लोकसभेबाबत सूचक वक्तव्य केलेलं आहे. महाविकास आघाडीचा अद्याप फॉर्मुला ठरलेला नाही हा फॉर्म्युला ठरण्यात काही प्रॉब्लेम येणार नाही असा विश्वासही छत्रपती शाहू महाराजांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार यांनी मंगळवारी कोल्हापुरातील न्यू पॅलेस इथे शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यावेळी शरद पवार यांनी शाहू महाराजांना कोल्हापूर मतदारसंघातून लोकसभेची ऑफर दिल्याचे समजते. शाहू महाराज लोकसभा निवडणुकीत उभे राहिले तर आनंदच होईल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com