Shalarth ID scam : शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण; शिक्षकांचे वेतन रखडल्याने शिक्षक चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला

नागपुरात शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर मागील 9 महिन्यापासून शिक्षकांचे वेतन रखडले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Shalarth ID scam case) नागपुरात शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर मागील 9 महिन्यापासून शिक्षकांचे वेतन रखडले आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिक्षकांचे वेतन रखडल्याने शिक्षक मोठ्या संख्येने चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आहे.

आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून शिक्षण विभागाकडून लवकरात लवकर वेतन देण्याच्या सूचना कराव्या यासाठी शिक्षक बावनकुळे यांची भेट घेण्यासाठी आले असल्याची माहिती मिळत आहे.

नागपूर खंडपीठकडून सुद्धा दोन हप्त्यात रखडलेले वेतन देण्याची निर्देश दिले गेलेत. याच्याआधी दोन दिवसांपूर्वी त्यांच्याकडून शिक्षण उपसंचालक कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते.

Summery

  • शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण

  • शिक्षकांचे वेतन रखडल्याने मोठा संख्येने शिक्षक पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला

  • दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयात आंदोलन सुद्धा केले होते

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com