Sanjay Shirsat | Abdul Sattar| सत्तार, शिरसाटांमध्ये वादाची ठिणगी? Shambhuraj Desaiयांनी बाजू सावरली

संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वादावर शंभूराज देसाई यांनी दिलेले स्पष्टीकरण, शिवसेनेत मतभेदांच्या चर्चेला मिळाली नवी दिशा.
Published by :
shweta walge

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, त्यांच्याच नेतृत्वातील शिवसेनेत मोठी धुसफूस सुरू असल्याचं समोर आलेय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी-माजी मंत्र्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. माजी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू आहेत. जाहीर सभेत संजय शिरसाट यांनी सत्तार यांचा समाचार घेतला. यावरुनच शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी संजय शिरसाठ आणि अब्दुल सत्तार यांच्यात कोणताही वाद नाही, त्यांनी सभेत वक्तव्य करताना कोणाचेही नाव घेतलेले नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com