Nanded : LOKशाहीचे संपादक कमलेश सुतार यांना शंकरराव चव्हाण पत्रकारिता पुरस्कार

लोकशाही संपादक कमलेश सुतार राज्यस्तरीय डॉ. शंकररावजी चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कराने सन्मानित

नांदेड : निःपक्ष आणि निर्भिड पत्रकारितेतील योगदानाबाबत जेष्ठ पत्रकार आणि लोकशाही वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक कमलेश सुतार यांचा डॉ. शंकरराव चव्हाण विकास पत्रकारिता पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. नांदेडमध्ये पत्रकार दिनानिमित्त आयोजित एका सोहळ्यात कमलेश सुतार यांचा गौरव करण्यात आला.

मीमांसा फाउंडेशन, मीडिया-पोलीस क्लब, दैनिक समीक्षा आणि मंथन क्रिएटिव्ह ग्रुपच्या संयुक्त विद्यमानं हा पुरस्कार देण्यात येतो. यशपाल भोसले, हैदर अली, नंदकिशोर तोष्णीवाल, धनंजय कुलकर्णी, विजयालक्ष्मी सोनटक्के यांना जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. माधुरी देशपांडे, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, माहिती अधिकारी विनोद रापतवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com