व्हिडिओ
Sharad Pawar on Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांच्या अटकेवरून शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली आहे. कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. ईडीकडून दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने केजरीवाल यांना अटक केली. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवालांना केलेली अटक चुकीची असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सरकारकडून तपास यंत्रणाचा गैरवापर सुरू आहे असं देखील शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्याच्या प्रमुखांना धोरण ठरवले म्हणून अटक करणे चुकीचे. शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. केजरीवाल दिल्लीतील सर्व जागा जिकंतील. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल. निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केजरीवालांना अटक झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे.