Sharad Pawar: 'या' प्रकरणी शरद पवार हायकोर्टात; केली ही मागणी...

लवासाप्रकरणी शरद पवार यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
Published by :
Team Lokshahi

लवासाप्रकरणी शरद पवार यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. लवासा प्रकल्पाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना याचिकाकर्त्याने जुनेच आरोप करीत दाखल केलेल्या जनहित याचिकेत हस्तक्षेप करण्यास मुभा द्या, अशी विनंती पवार यांनी आपल्या याचिकेत केली आहे. जनहित याचिका मनमानी आणि अर्थहीन असल्याचा दावा देखील शरद पवार यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com