Kolhapur Shivsena Sabha: कोल्हापुरात शिंदेंची जाहीर सभा, सभेसाठी जय्यत तयारी सुरू

कोल्हापुरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. ही सभा सायंकाळी पाच वाजता गांधी मैदान येथे होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

कोल्हापुरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. ही सभा सायंकाळी पाच वाजता गांधी मैदान येथे होणार आहे. असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज या महा अधिवेशनात सहभागी राहतील. या सभा परिसरामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून बॅनरबाजी करण्यात आली आह. त्याचबरोबर ठाकरे गटाचे असंख्य पोस्टर झळकत आहेत. संध्याकाळी 5 वाजता कार्यक्रमाची सुरूवात होणार असून कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय मार्गदर्शन करणार, काय संदेश देणार यासाठी सर्वेच उत्सुक आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com