मुंब्र्यात हायव्होलटेज ड्रामा! ठाकरे आणि शिंदे गट आमने- सामने

शिवसेनेची मुब्रा इथली शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आल्यानं मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे हे स्वतः या ठिकाणी भेट देण्यासाठी पोहोचले आहेत.
Published by  :
shweta walge

शिवसेनेची मुब्रा इथली शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आल्यानं मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे हे स्वतः या ठिकाणी भेट देण्यासाठी पोहोचले आहेत. पण यावरुन दोन्ही गटांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी दाखल झाले असून अनुचित घटना घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली जात आहे.

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाखेला घेराव घातला आहे. उद्धव ठाकरे यांना शाखेपर्यंत पोहोचू न देण्याचा निर्धार शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर शाखेत गेल्याशिवाय माघारी फिरणार नाही, असा पवित्राच उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे मुंब्र्यात अति प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. पोलीस दोन्ही गटाला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र, दोन्ही गट ऐकायला तयार नसल्याने पोलिसांचीही चांगलीच कोंडी झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com