eknath shinde
eknath shindeTeam Lokshahi

'हान एकनाथ च्या पण डोक्यात' मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर दगडफेक, व्हिडिओ होतोय व्हायरल

सदा सरवणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर जाऊन शिवसैनिकांनी गोंधळ

राज्यात सत्तांतरानंतर शिवसेना आणि शिंदे गटाचा वाद दररोज नव्याने उफाळून येतो. अशातच काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे प्रवक्ते सदा सरवणकर आणि शिवसेनेतील वाद शिंगेला पोहचला होता. त्यानंतर हा वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहचला होता. सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा सुद्धा आरोप झाला होता. त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सदा सरवणकर यांच्या जनसंपर्क कार्यालयावर जाऊन शिवसैनिकांनी गोंधळ घातला होता.

त्या गोंधळात शिवसैनिकांनी बॅनरवर दगड मारतांना व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओ मध्ये एक कार्यकर्ता एकनाथला मार एकनाथला असे जोरात ओरडताना दिसत आहे.

Lokshahi
www.lokshahi.com