Samruddhi Mahamarg : धोकादायक पध्दतीने ड्रायव्हिंग करणाऱ्या चालकावर कारवाई

समृद्धी महामार्गावर झालेला अपघात आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळेच झाल्याचं समोर आलं आहे.
Published by :
Team Lokshahi

समृद्धी महामार्गावर झालेला अपघात आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळेच झाल्याचं समोर आलं आहे. समृद्धीवर अत्यंत वेगाने गाड्या जात असतानाही अधिकाऱ्यांनी ट्रकला भर रस्त्यातच थांबवलं होतं. याच ट्रकला धडकून टेम्पो ट्रॅव्हलरमधल्या 12 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अपघाताच्या काही काळ आधीचा ट्रक थांबवलेला हा व्हिडिओ आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिसांनी प्रदीप छबुराव राठोड आणि नितीनकुमार गणोरकर या दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com