VIDEO : हिंजवडीत धक्कादायक प्रकार; 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडलं
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(VIDEO) हिंजवडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगणवाडीत वीस लहान मुलांना कोंडून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे.
काल दुपारी 11 ते 12 च्या दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला असून हिंजवडीतील अंगणवाडी क्रमांक तीनच्या सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांनी हा प्रकार केला असल्याची माहिती मिळत असून या प्रकारानंतर आता संताप व्यक्त केला जात आहे. मुलांना कोंडून ठेवल्याने मुलं रडत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
ग्रामपंचायतीत एका माजी सरपंचाने बैठकीला बोलावलं म्हणून आम्ही मुलांना आत ठेवून अंगवाडीला कुलूप लावला. असा खुलासा त्या दोन महिलांनी केला आहे. हा सर्व प्रकार पाहून पालकांनी चांगलाच संताप व्यक्त केला.
Summery
हिंजवडीत धक्कादायक घटना
वीस लहानग्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याच्या प्रताप समोर
पालकांनी केला संताप
