Shraddha Walker Father: निर्घृण हत्या केलेल्या श्रद्धा वालकरच्या वडिलांचे निधन

श्रद्धा वालकर हत्याकांडातील पीडितेचे वडील विकास वालकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. दोन वर्षांपासून मृतदेहाच्या अवशेषांची मागणी अपुरीच राहिली.
Published by :
Prachi Nate

श्रद्धा वालकर हत्याकांडाला दोन वर्ष पूर्ण झाले आहे, या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. प्रियकराने निर्घृणपणे हत्या केलेल्या श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांचे निधन झाले आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीसह संपूर्ण देश हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांडाला दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे.

तेव्हापासून श्रद्धाचे वडील अंत्यसंस्कारासाठी आपल्या मुलीचा मृतदेह देण्याची मागणी करत होते. पण, शेवटपर्यंत त्यांची इच्छा अपुरीच राहिली. श्रद्धाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिचे वडील विकास वालकर मृतदेहाच्या अवशेषांची मागणी करण्यासाठी गेल्या वर्षभर दिल्लीत फेऱ्या मारल्या.

मात्र, या खटल्याचा जलदगती न्यायालयात निकाल लागला नाही. तसेच पोलिसांच्या तपासातील दिरंगाईबाबत नेमलेल्या विशेष तपास पथकानेही काहीच कारवाई केली नाही, असा आरोप विकास वालकर यांनी केला होता. मात्र आता तिच्या वडिलांची इच्छा अपुर्णचं राहिली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com