Shrikant Shinde AT Satara Dare Village : खासदार श्रीकांत शिंदे दरे गावात दाखल

खासदार श्रीकांत शिंदे दरे गावात दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदेंची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेंसोबतच मुंबईला जाण्याची शक्यता आहे.

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या मूळ गाव दरे येथे निवासस्थानी तीन दिवसाच्या मुक्कामासाठी व विश्रांतीसाठी आले आहेत. दरम्यान, गावी आल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे आजारी पडले आहेत. त्यांना व्हायरल इन्फेक्शन झाला असल्याची माहिती देखील वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे. खासदार श्रीकांत शिंदे दरे गावात दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदेंची तब्येत स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेंसोबतच मुंबईला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ठाण्यात पोहोचणार आहेत. महायुतीची संध्याकाळी बैठक होण्याची शक्यता आहे. शिंदे संध्याकाळी महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार असल्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com