मविआला निम्म देखील यश नाही; श्रीकांत शिंदेंचा निशाणा

ग्रामपंचायत निकालांमध्ये महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायतींचे निवणुकीचे निकाल आज जाहिर झाले आहेत. ग्रामपंचायत निकालांमध्ये महायुतीचे वर्चस्व दिसून येत आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ग्रामपंचायतमधील यश म्हणजे जनतेचा आशीर्वाद आहे. महायुतीला जनतेचा भरभरून आशीर्वाद मिळाला असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. मविआला निम्म देखील यश नाही, असा निशाणाही श्रीकांत शिंदेंनी साधला आहे. तसेच, 45 पेक्षा अधिक जागा पुढे लोकसभेत निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com