व्हिडिओ
Smart Meter | महाराष्ट्रातील प्रत्येक घरात लागणार स्मार्ट मीटर; वीज मिळणार स्वस्त?
महाराष्ट्रातील प्रत्येक घरात स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे दररोज वीज खर्चाचे हिशेब पाहता येणार आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक घरात स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहेत. वापरलेल्या वीजेचं बील मोबाईलवर पाहता येणार आहे. दररोज घरात किती वीज खर्च होते याचा हिशेब ग्राहकांच्या मोबाईलवर दिसणार आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. स्मार्ट मीटरमुळे बिलिंग त्रुटींची समस्या दूर होईल. तसेच दररोज घरात किती वीज खर्च होतो याचा हिशेब ग्राहकांच्या मोबाईलवर दिसणार आहे. यासाठी विद्युत विभाग एक ॲप तयार करत आहे. ज्यामध्ये दैनंदिन वीज बिलासह सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.