Pune Crime : पुणे विमानतळावर साडेतीन कोटींच्या सोन्याची तस्करी; महिलेसह दोघांना अटक

पुणे विमानतळावर तब्बल साडेतीन कोटींचे सोने जप्त करण्यात आलं आहे. सोन्याच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

पुणे विमानतळावर तब्बल साडेतीन कोटींचे सोने जप्त करण्यात आलं आहे. सोन्याच्या तस्करीप्रकरणी पोलिसांनी महिलेसह दोघांना अटक केली आहे. दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला पुणे विमानतळावर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून महिलेला 7 किलो सोन्यासह अटक केली आहे. आरोपींनी 6 किलो 912 ग्रॅम वजन असलेल्या सोन्याची पावडर केली होती. ती पावडर त्यांनी पट्टा आणि पाकिटात लपवून ठेवली होती दुबईहून सोन्याची तस्करी करून एक महिला पुणे विमानतळावर येणार असल्याची माहिती डीआरआय मिळाली होती. तब्बल६ किलोचे साडेतीन कोटींचे सोने जप्त केले आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com