CM Eknath Shinde | ... तर त्यांचा जनताच एन्काऊंटर करेल - मुख्यमंत्री शिंदे यांचं वक्तव्य
दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांचा एन्काऊंटर जनता मतपेटीतून करेल असं शिंदे यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंची कराडमधील कार्यक्रमातून विरोधकांवर टीका केली आहे. राज्याच्या विकासातील स्पीडब्रेकर आम्ही काढले असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. विरोधकांचं दोन्ही बाजूने बोलण्याचं काम सुरू आहे, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य केलं आहे.
कुठलेही चांगलं काम करा, विकासाचं काम करा, याच्याविरोधात कुठली योजना आणा याच्याविरोधामध्ये, जनतेची योजना त्याच्याविरोधामध्ये, माझ्या लाडक्या बहिणींची योजना त्याच्या विरोधात, माझ्या लाडक्या भावांचं, लाडक्या शेतकरींची योजना त्याच्या विरोधात मला सांगा अशा लोकांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीमध्ये जनता जनार्धन मतंपेटींद्वारे या अशा दुटप्पी आणि या अशा दुष्ट लोकांना मतंपेटींद्वारे त्यांचा एन्काऊंटर केल्याशिवाय राहणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.