Social Media News | लहान मुलांनो सांभाळून; सोशल मिडियावर अकाउंट पालकांच्या परवानगीने बनणार

केंद्र सरकारच्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन नियमांनुसार, १८ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया अकाउंटसाठी पालकांची परवानगी आवश्यक असेल.
Published by :
shweta walge

केंद्र सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन नियमांचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यात १८ वर्षांखालील मुलांसाठी महत्त्वाचा नियम घालण्यात आला ही तरतूद केंद्राच्या डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अधिनियम २०२३ च्या मसुद्यातील नियमात करण्यात आली आहे. यासंदर्भातील केंद्राने शुक्रवारी अधिसूचना जारी केली आहे.

या मसुद्यात १८ वर्षाखालील मुलांसाठी एक महत्वाचा नियम समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर खाते उघडण्यासाठी आई-वडिलांची परवानगी घेणं आवश्यक असणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com