Kalyan Loksabha: कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध केदार दिघे? केदार दिघेंची लोकशाहीला प्रतिक्रिया

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध केदार दिघे असणार का? असा सवाल उपस्थित होत आहे कारण शिवसेना उबाठाकडून केदार दिघेंनच्या नावाची चर्चा होत आहे.
Published by :
Sakshi Patil

कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध केदार दिघे असणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण ठाकरे गटाकडून केदार दिघेंच्या नावाची चर्चा होत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटातून केदार दिघे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरे गटाकडून आज किंवा उद्या नाव जाहीर होणार असल्याची शक्यता आहे. उत्तर मुंबईतूनही तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा होत आहे तर उत्तर मुंबईत पियूष गोयल विरुद्ध तेजस्वी घोसाळकरअसा सामना होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. यावर केदार दिघे म्हणाले की, पक्षाने संधी दिली तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी लढवणार असल्याचं केदार दिघेंनी स्पष्ट केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com