Video: देवेंद्र फडणवीस यांनी गायलं श्रीवल्ली गाणं, तर नितीन गडकरी यांनी तुझसे नाराज नही...

सोशल मीडियावर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
Published by :
shweta walge

सोशल मीडियावर सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गाणं गाताना दिसत आहेत.

नागपूरमधील उद्योजक प्यारे खान यांच्या मुलीच्या लग्नाचे रिशेप्शन होते. या कार्यक्रमास नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अल्लू अर्जूनच्या श्रीवल्ली या हिट गाण्यातील काही ओळी गायल्याचे पाहायला मिळाले नितीन गडकरी यांनी तुझसे नाराज नही जिंदगी हे गाणं गायलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com