Sassoon Hospital Pune : पुण्यातील ससून रुग्णालयात लाच घेताना कर्मचारी जाळ्यात

पुण्यातील ससून रुग्णालयात लाच घेताना कर्मचारी जाळ्यात अडकलेला आहे. मेडिकल बिले मंजुरीसाठी कर्मचाऱ्याने लाच घेतली असून रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात लाच घेताना कर्मचारी जाळ्यात अडकलेला आहे. मेडिकल बिले मंजुरीसाठी कर्मचाऱ्याने लाच घेतली असून रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानी ही कारवाई केली आहे. ससून रूग्णालयातील उपअधीक्षक कार्यालयात आलेली वैद्यकीय देयके मंजूर करुन देतो, असे सांगून रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेणाऱ्या लिफ्टमनला एसीबीने पकडले. जालिंदर कुंभार असे लाचखोर लिफ्टमनचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका नोकरदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. नोकरदाराने 1 लाख 43 हजार रुपयांचे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी जून महिन्यात सादर केले होते. बिल मंजूर करण्यासाठी तक्रारदार ससून रूग्णालयात हेलपाटे मारत होते.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com