Prakash Ambedkar : 'वंचित जी भूमिका घेईल त्याच्या पाठीशी उभे राहा',आंबेडकरांच कार्यकर्त्यांना आवाहन

युती संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सल्ला घेतला होता.
Published by :
Dhanshree Shintre

युती संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा सल्ला घेतला होता. त्याबद्दल प्रकाश आंबेडकरांनी आभार व्यक्त करत, आजोबाने चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधात होती, आणि ही लाचारी मी पण मान्य करणार नाही. युतीमध्ये अडचण येऊ नये, म्हणून वाद-हेवेदावे येऊ दिले नाही. पण जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते. लाचर करून संपवल्या जाते, याला आम्ही कधीही मान्य करणार नाही. अशी स्पष्ट भूमिका प्रकाश आंबेडकरांनी मांडली आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या मतदारांना मी जिंकलो पाहिजे अशी भावना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. चळवळीचा विचार हा सर्वात महत्वाचा आहे. व्यक्तीचा विचार हा व्यक्तीपर्यंतच राहतो. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या मतदारांचा वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा आहे, अस मी गृहीत धरतो असही आंबेडकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com