Nashik | बडगुजरांची १० जानेवारीला पुन्हा चौकशी

नाशिकच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची एसीबीकडून पावणे दोन तास चौकशी झाली. दरम्यान बडगुजर यांनी आणखी काही प्रश्नांची उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती समोर येत आहे.
Published by :
Team Lokshahi

नाशिकच्या ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. बडगुजरांची आजही एसीबीकडून पावणे दोन तास चौकशी झाली. यासाठी बडगुजर यांनी आणखी काही प्रश्नांची उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती समोर येत आहे. यानुसार बडगुजरांना १० जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलवले आहे.

दरम्यान, २०१६ साली बडगुजर यांनी पदाचा गैरवापर करून कंपनीला महापालिकेचा ठेका घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी एसीबीकडून चौकशी सुरू होती. तर, दुसरीकडे सलीम कुत्ता प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com