व्हिडिओ
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवारांकडून शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न?
31 जानेवारीला सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sunetra Pawar) सुनेत्रा पवार यांनी 31 जानेवारीला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी सुनेत्रा पवारांकडून शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची माहिती मिळत आहे.
शपथविधीला जाण्यापूर्वी भेटीसाठी फोन केला होता. अजितदादा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर मुंबईला येण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी गोविंद बाग या निवासस्थानी फोन केला होता. मात्र शरद पवार यांच्या कुटुंबियांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती मिळत आहे.
Summary
सुनेत्रा पवारांकडून शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी भेट घेण्याचा केला प्रयत्न
बारामतीमध्ये भेट घेण्यासाठी प्रयत्न केला होता
