'बिहारमध्ये सत्तेत असताना सर्वेक्षणाला पाठिंबा होता'; केंद्रीय मंत्री अमित शाह यांचं वक्तव्य

जातीवर आधारित सर्वेक्षणात अडथळे निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा कधीही हेतू नव्हता असं स्पष्टीकरण अमित शाह यांनी केलं आहे.
Published by :
Team Lokshahi

जातीवर आधारित सर्वेक्षणात अडथळे निर्माण करण्याचा केंद्र सरकारचा कधीही हेतू नव्हता असं स्पष्टीकरण अमित शाह यांनी केलं आहे. भाजप बिहारमध्ये सत्तेत असताना त्याला पाठिंबा दिला होता, तसेच राज्यपालांनी त्याबाबतच्या विधेयकालाही मंजुरी दिली होती, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी केले. ‘ईस्टर्न झोनल कौन्सिल’च्या २६ व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरू शहा बोलत होते, ते म्हणाले की जातसर्वेक्षणाबाबत काही प्रश्न होते, ते बिहार सरकार सोडवू शकेल, अशी आशा आहे. या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंडचे वरिष्ठ मंत्री उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com