व्हिडिओ
हरी नरकेंच्या आठवणींना उजाळा देताना सुषमा अंधारेंना अश्रू अनावर!
हरी नरके यांच्या अंत्यदर्शनावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सुषमा अंधारेंना अश्रू अनावर झाले.
फुले साहित्याचे अभ्यासक, विचारवंत, समता परिषदेचे उपाध्यक्ष हरी रामचंद्र नरके यांचं निधन झालं आहे. मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांच्या निधनाने समता चळवळीचा आघाडीचा शिलेदार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. हरी नरके यांच्या अंत्यदर्शनावेळी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सुषमा(Sushma Andhare) अंधारेंना अश्रू अनावर झाले.