Sushma Andhare: शिवसेना UBTच्या जाहिरातवरून चित्रा वाघांचा हल्लाबोल, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहीरातीत पॅार्न स्टारचा समावेश असल्याचा आरोपांना चित्रा वाघ यांनी केला. यावर आता सुषमा आंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Published by :
Sakshi Patil

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहीरातीत पॅार्न स्टारचा समावेश असल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला. यावर आता सुषमा आंधारेंनी उत्तर दिलं आहे. उल्लू अॅपवर पॉर्न स्टारचे घाणेरडे व्हिडिओ ही व्यक्ती बनवते असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. जाहिरात कंपनी आणि उद्धव ठाकरेंचा काय संबंध? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

ती जाहीरात आणि त्या जाहीरातीतलं पात्र आणि त्यांच्या संदर्भातली जी काय वक्तव्य आहेत, आम्ही कधी पॅार्न व्हिडिओ नाही बघत त्यामुळे आम्हाला नाही माहीत की काय चाललं असतं. कदाचित त्या आक्रस्ताळबाई पॅार्न व्हीडीओ बघण्यात जास्त उत्सुक असतील, असं त्या म्हणाल्या.

प्रज्वल्ल रेवण्णाचे तीन हजार पेक्षा जास्त व्हिडिओ बाहेर आल्या आहेत. त्यावर त्या काय बोलणार आहेत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com