Sanjay Raut On Ashok Chavan: 'तत्वाबाबत बोलणं चव्हाणांना शोभत नाही', संजय राऊतांची चव्हाणांवर टीका

अशोक चव्हाण कॉंग्रेस सोडून गेले. ज्यांच्या परिवाराचं पूर्ण आयुष्य कॉंग्रेस पक्षात गेलं, ज्यांना सगळ कॉंग्रेस पक्षाने दिलं, ते गेले. अशोक चव्हाण यांना तत्त्वांवर बोलणं शोभत नाही.
Published by :
Team Lokshahi

अशोक चव्हाण कॉंग्रेस सोडून गेले. ज्यांच्या परिवाराचं पूर्ण आयुष्य कॉंग्रेस पक्षात गेलं, ज्यांना सगळ कॉंग्रेस पक्षाने दिलं, ते गेले. अशोक चव्हाण यांना तत्त्वांवर बोलणं शोभत नाही. लढणारे लोक तत्त्वांवर बोलू शकतात. अशोक चव्हाण तत्त्वांवर बोलले तर लोक त्यांच्यावर हसतील, त्यामुळे हेच चांगलं होईल की ते शांत राहतील, असा निशाणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावर साधला आहे. तसेच दिल्लीतील शेतकरी प्रमुखांच्या आम्ही संपर्कात असून महाराष्ट्र या आंदोलनात काय योगदान देऊ शकेल याबाबत निर्णय घेऊ असेही राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com