Jalgaon : शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
Published by  :
Team Lokshahi

जळगाव: उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यात यावे, शिक्षकांचे रखडलेली वेतन तात्काळ देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान मागण्या मान्य झाल्यास 24 ऑगस्ट नंतर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com