श्रीराम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले, २२ जानेवारीला…; तेजप्रताप यांचं वक्तव्य

राम मंदिरावरुन देशभरात राजकारण तापले आहे. अशातच, लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र तेजप्रताप यांनी मोठे विधान केले आहे.

नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं काम वेगाने चालू आहे. २२ जानेवारी रोजी या मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यावरुन मात्र देशभरात राजकारण तापले आहे. अशातच, लालू प्रसाद यादव यांचे सुपूत्र तेजप्रताप यांनी मोठे विधान केले आहे.

श्रीराम माझ्या स्वप्नात आले होते. त्यांनी मला सांगितलं की, ते येत्या २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ते अयोध्येला येणार नाहीत. श्रीराम मला म्हणाले, सध्या अयोध्येत जे काही चाललंय ते ढोंग आहे. त्यामुळे मी त्या दिवशी तिकडे येणार नाही, अशी अप्रत्यक्ष टीका तेजप्रताप यादव यांनी भाजपवर केली आहे. निवडणुका आल्या की मंदिराचा विषय येतो. निवडणुका पार पडल्यानंतर मंदिराला कोणी विचारत नाही. कोणीही त्याबद्दल बोलत नाही, असेही त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com