सुषमा अंधारेंना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या; ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

'सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या', अशी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.
Published by :
Team Lokshahi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू झालेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी आमदार सुभाष भोईर यांचे नाव सुरुवातीला चर्चेत होते. त्यापाठोपाठ आदित्य ठाकरे यांचे देखील नाव चर्चेत आहे. परंतु, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आता सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे आता होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com