Adani Maharashtra Projects : अदानींच्या विद्युत प्रकल्पाला ठाकरे गटाचा विरोध

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंजिवडे वाशी गावात गौतम अदानींचा महाकाय वीज प्रकल्प होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंजिवडे वाशी गावात गौतम अदानींचा महाकाय वीज प्रकल्प होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खासदार विनायक राऊतांची आंजिवडे वाशी गावातील गावकऱ्यांनी भेट घेतली. या भेटीत त्यांनी गुपचूप प्रकल्पाची उभारणी सुरु असल्याचा आरोप केला. अदानीच्या या वीज प्रकल्पाला 2022 मध्येच गुपचूप परवानगी दिल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या वीज प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामपंचायतीला माहिती नाही असं सांगण्यात येतं आहे. जवळपास 173 एकर जमीन अदानींच्या या प्रकल्पाला दिल्याचा आरोपही विनायक राऊतांनी केला आहे. वनविभागातील एक इंचही जागा अदानींना देऊ देणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com