Ashadhi Wari : संत तुकाराम महाराजांचा 339 वा पालखी सोहळा

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 339 वा पालखी सोहळा देहूमध्ये पार पडणार आहे. सकाळपासूनच या सोहळ्याला सुरुवात झाली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 339 वा पालखी सोहळा देहूमध्ये पार पडणार आहे. सकाळपासूनच या सोहळ्याला सुरुवात झाली आहे. काल्याचे किर्तन होणार आहे, आरतीने पालखी प्रस्थान होणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे व आमदार सुनील शेळके ह्या पालखी सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 339 वा पालखी प्रस्थान सोहळा आज देहू नगरीत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देहूमधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. लाखो देशी-विदेशी फुलांचा वापर करून ही सजावट संपूर्ण देहूमधील मंदिरात करण्यात आली आहे. मंदिर परिसरात संत तुकाराम महाराजांचे फुलांनी तयार चित्र देखील तयार करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com