व्हिडिओ
Uddhav Thackeray On Bjp Govenment : "भाजपाचं Over Load झालेलं जहाज बुडणार..."; उद्धव ठाकरेंनी 3 पक्षांच्या प्रमुखांचे नाव सुद्धा स्पष्ट केलं
उद्धव ठाकरे: भाजपाचं जहाज ओवरलोडमुळे बुडणार, आमचं सुरक्षित राहणार.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना भवनमध्ये नुकतीच बैठक पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील नेत्यांना महाराष्ट्रभर दौरा करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत. भाजपाचे ओवर लोड झालेलं जहाज बुडणार आहे, आमचं जहाज बुडणार नाही. असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी लगावला. अमित शहा हे 3 पक्षांचे प्रमुख आहेत. ते अजित पवार आणि शिंदेंच्या पक्षाचेही प्रमुख आहेत. सत्ता येते व जाते. सत्ता आल्यावर हुरळून जायचे नाही असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केल्याची माहिती मिळत आहे.