Maharashtra: केंद्राने पाठवला होता 12 किल्ल्यांचा नावांचा प्रस्ताव

जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारने युनेस्कोला पाठवला होता.
Published by :
Dhanshree Shintre

जागतिक वारसा स्थळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्र सरकारने युनेस्कोला पाठवला होता. या प्रस्तावानंतर युनेस्कोचे अधिकारी ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये राज्यामध्ये येणार असल्याची माहिती आहे. दौऱ्याच्या नियोजनासाठी आणि प्रस्तावातील गड-किल्ल्यांच्या संवर्धन कामाबाबत राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी मंत्रालयात नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीला युनेस्कोचे भारताचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com