व्हिडिओ
SSC Exam Result 2025 : विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली! उद्या दहावीचा निकाल, कुठे आणि कसा पाहाल?
उद्या 13 मे ला दुपारी 1 वाजता 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे.
12वी नंतर आता 10वीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केल्या नंतर आता उद्या म्हणजेच 13 मे ला दुपारी 1 वाजता 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे.
10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा 12 मे ला लागणार होता मात्र बुद्ध पौर्णिमेची सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे आता 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल हा उद्या लागणार आहे. mahresult.nic.in, results.gov.in, DigiLocker या लिंकद्वारे विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. यानंतर बोर्डाकडून पत्रकार परिषदेत राज्याचा निकाल, मुलींचे आणि मुलांचे उत्तीर्ण प्रमाण, जिल्हानिहाय उत्तीर्ण आकडेवारी सांगितली जाईल.