Shambhuraj Desai On Vijay Shivtare: बारामतीतून लढण्याची भूमिका व्यक्तिगत,शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया

शिवसेनेत विजय शिवतारे एकाकी पडले आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. बारामतीतून लढण्याची भूमिका व्यक्तिगत असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे.
Published by :
Dhanshree Shintre

शिवसेनेत विजय शिवतारे एकाकी पडले आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. बारामतीतून लढण्याची भूमिका व्यक्तिगत असल्याचं शंभूराज देसाईंनी म्हटलं आहे. विजय शिवतारे यांची भूमिका सेनेची भूमिका नाही असे देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेने शिवतारे संदर्भात जबाबदारी झटकली का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. शिवतारे बंडाचा झेंडा कायम ठेवणार का असा सवाल देखील उपस्थित झाला आहे.

शंभुराज देसाई म्हणाले की, विजय शिवतारे साहेब आमच्या पक्षाचे माजी राज्यमंत्री आहेत. पक्षसंघटनेमध्ये ते सक्रिय आहेत. त्यांनी एखादं मत व्यक्त केलं म्हणजे ते पक्षाचे नव्हे ते त्यांचं व्यक्तीगत मत आहे. तरीसुद्धा जेव्हा महायुती म्हणून आपण एकत्र जात आहे. जेव्हा बारामतीच्या जागेबाबतीत या तीन प्रमख नेत्यानी आमच्या काही निर्णय घेतला आहे. त्याच्याशी विसंगत भूमिका शिवसेनेच्या कुठल्याही नेत्यानी घेणं योग्य नाही. निश्चितपणे शिवतारे बापूंच्या बरोबर चर्चा करुन त्यांचे जे काही गैरसमज झाले असतील ते गैरसमज नक्की दूर केले जातील. याच्यावरुन कोणताही वाद याठिकाणी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com