Thane: सुपरमॅक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा एल्गार

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हद्दपार होत असतानाच अशातच ठाण्यातील नितीन जंक्शन येथे असणारी सुपरमॅक्स कंपनी देखील बंद पडली आहे.

महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प हद्दपार होत असतानाच अशातच ठाण्यातील नितीन जंक्शन येथे असणारी सुपरमॅक्स कंपनी देखील बंद पडली आहे. याच कारणांमुळे कंपनीमधील शेकडो कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. मागील एक वर्षांपासून ही कंपनी बंद असल्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वारंवार भेट घेऊन त्यांना पत्र व्यवहार करून देखील त्यांचा तिढा हा अद्यापही सुटला नाही. तसेच कामगार नेते किरण पावसकर यांनी देखील कामगारांची कंपनीमध्ये भेट घेऊन त्यांना आश्वासन दिले असता तरीदेखील कामगारांचा प्रश्न जैसे तेच आहे. अखेरीस वर्षाच्या पहिल्याच दिवशी या सर्व कामगारांनी गांधीगिरी पद्धतीने पुन्हा एकदा आंदोलन सुरू केले असून कंपनीमधील एक कर्मचारी चक्क आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची वेशभूषा परिधान करून आंदोलनाच्या मंचावर दिसून आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com