Rajya Sabha : महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात, महायुतीच्या उमेदवारबाबत सस्पेन्स कायम

राज्यसभेसाठी भाजपकडून मध्य प्रदेश आणि ओडिशा येथील उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

राज्यसभेसाठी भाजपकडून मध्य प्रदेश आणि ओडिशा येथील उमेदवाराची नावे जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहेत. तर भाजपकडून महाराष्ट्रातील नावाबाबत कमालीची गुप्तता आतापर्यंत बाळगण्यात आली आहे. अशोक चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब असल्याची माहिती आहे. मात्र अन्य 2 नावांबाबत भाजपकडून अद्यापही सस्पेन्स कायम आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे, विश्वास पाठक, वेधा कुलकर्णी, चित्रा वाघ यांच्या नावाची अधिक चर्चा आहे. तर भाजप नेमकं कोणाला संधी देणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com