Maratha Reservation : आरक्षण मिळेपर्यंत घराचा उंबरठा ओलांडणार नाही

मराठा आरक्षण मिळेपर्यंत घराचा उंबरा ओलांडणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे.
Published by  :
Team Lokshahi

मराठा आरक्षण मिळेपर्यंत घराचा उंबरा ओलांडणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा मनोज जरांगे पाटलांनी घेतली आहे. घरी दिवाळी साजरी न करता जरांगे आंदोलनस्थळी पोहचलेत. मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत दिवाळी किंवा कोणताही सण साजरा करणार नाही असंही जरांगे पाटील म्हणालेत. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी त्यांचा लढा अधिक तीव्र करणार असल्याचं सांगितलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com